STORYMIRROR

Pradeep Sahare

Others

3  

Pradeep Sahare

Others

थकले

थकले

1 min
145

आज ती,

सहजच बोलली,

मनातली गाठ खोलली.

"अहो,

तुम्ही आता थकले.

थोडेसे आता,

कमरेने वाकले.

काल बोलत होता,

चालतांना थोडी लागली धाप.

मला पण थोड़ा,

अंगात होता ताप."

मी म्हटले,

"तसं काही नाही,

कालच तर होती घरी,

लग्नाच्या गोल्डन,

जुबलीची घाई."

मग थोडी ती,

गालातच हसली.

थोड़ी जवळ बसली.

घेऊन हातात हात.

बोलली,

"अशीच राहू द्या,

शेवटपर्यंत साथ."

शब्दाचे बोल,

हृदयाला कळले.

न कळत डोळ्यामधून,

अश्रू मात्र पडले.


Rate this content
Log in