दवंडी
दवंडी
सकाळी सकाळी,
राम्या आला घरी.
माझी चालू होती,
ऑफिसची तयारी.
टीव्ही होता चालू,
सोफ्यावर बसला.
माया रामभाऊ.
टीव्हीवर आली,
लक्सची अॅड.
राम्या म्हणे हे आहे,
"दवंडी"चं नवं फॅड.
मी थोड़ा दचकलो,
गळा थोडा खाकरून,
विचारलं मी त्याले,
राम्या..
"दवंडी" म्हणजे काय ?
तो म्हणे, लेका,
"तू राहते, शहरात,
आम्ही राहतो खेड्यात.
एक आहे पश्चिम
दूसरं आहे पूर्व.
तुम्हाले आहे भाऊ,
शहराचा गर्व.
आम्ही जपतो भाऊ,
संस्कृतीचं पर्व."
मी म्हटलं लेका,
''वेळ नको खाऊ,
दवंडी काय सांग,
लवकर भाऊ."
तो म्हणे भाऊ,
"दवंडी आमच्या,
खेळ्यातली अॅड,
भागवत असो की,
मंदिरातला सप्ताह.
की आली असो,
कंट्रोलात तेल-साखर.
आम्ही दोघं भाऊ,
गावात जाऊन सांगो.
एक वाजवे घंटा,
दूसरा टपराच्या,
पुंगीत वाचून सांगे.
गावातली पोरं..
दवंङी आली म्हणत,
धावे मागे मागे.
आता ते गेलं मांगं,
अन् हे आलं पुढं
जीवन काय भाऊ,
नाही सुटलं कोडं..
सारं जग होत आहे,
अॅड संग वेडं.
एका घरी नाही भाऊ,
खायला ज्वारी-गहू,
तुच सांग भाऊ,
साबनीन आंघोळ
कसं काय पाहू."
मी सगळं समजलं,
दवंडी काय उमजलं.
एकच शब्द आला वानी,
जेऊन जाशील भाऊ,
बोललो त्याच्या कानी.
