पर्स
पर्स
1 min
245
पर्स ही नेहमीच,
तीची आवड़ीची ।
अगदी बाहुलीच्या,
खेळापासून तर...
म्हातारी आजीपर्यत ।
पर्स एक असतांना,
दूसरी आली नाही,
असे कधी झाले नाही ।
मोह मात्र सारखाच,
सगळ्याच पर्स चा ।
पर्स खांदयावर,
काही वेगळाच थाट,
पर्स घेऊनच करते,
ती आपल्यांची गाठ ।
फक्त पर्स से आकार,
आणी पर्स चे प्रकार,
थोड़े थोड़े बदलत गेले।
खने ,रकाने थोडे,
इकडे तीकडे झाले,
पण पर्स वेड़ नाही गेले।
पर्स म्हणजे तीचे,
सौदर्याचे दूकान असते ।
पर्स मधे तीच्या ,
काय काय नसत।
टीकली,पावड़र,
काजळ,बरच काही असत।
पन,बरच काही तीला,
वेळेवर दिसत नसत ।
मग होते चीड़ चीड़,
भराभर उघडती,
एक एक खानी,
नाहीच मिळाले,
मग पर्सच उतानी ।
मग हसते मनोमनी,
गाते मनातली गानी,
अशी आहे तीच्या,
पर्स ची कहानी ।
