रडू नको
रडू नको
सकाळी, सकाळी,
म्हाया दोस्त राम्या .
बसला होता सुमडीत.
मी म्हटल लेका,
"काय झाल तुले !
असा काऊन बसला.
खुड़क कोंबडी वानी.
काय चालल लेका,
सांग तुया मनी."
तो थोडा सावरला,
मग मायावर बावरला .
जोर जोरात हातवारे,
लागला तो करु.
मग झाल लेकाच,
भाषणच सुरु .
"तुमच काय भाऊ,
तुमी हाय पैसे वाले.
आमचे आम्हाला,
आता पाहवत नाही येले.
त आता असी गत झाली.
सरकार दर रोज,
महागाई न मारते.
रडाले लागलो त,
कोरोना धरते .
एक म्हणते मार,
दुसरा म्हणते,
रडू नको.
सरकार दाखवते,
लॉकडाऊनची भीती.
काय करु,काय नाही,
असी झाली गती.
मागच्या लॉकडाऊन मधे,
म्हैस विकली भाऊ .
तवा कुठ आनले,
खंडीभर गहू.
आता कुठ लागले,
थोडे थोडे कामाले हाथ.
माहीत नाही,
कोरोना भाऊ,
काय करते प्रताप ?
डोक्यामधे येते संताप"
रागान त्याचे डोळे,
लाल लाल झाले.
मी मनात म्हटल,
"सरक बाबू इथून,
आपन काही करु,
शकत नाही याले."
