STORYMIRROR

Pradeep Sahare

Others

3  

Pradeep Sahare

Others

घाट

घाट

1 min
239

घाट म्हटले तरी,

मनात कसे धस् होत ।

घाटा जवळून गेल तरी,

मनात कस धस् होत ।


घाटाची भीती,

घाटाचा बागलबुवा,

असा मनात भरला ।

मरनाच्या शेवटी पन,

पीच्छा त्याने पूरला ।


पन पाहिले का कधी!!

घाटाला तुम्ही जवळून ।

कित्येकाच्या आठवनी,

मनात येतात खवळून ।


आठवनी आल्या की,

ह्वदय भरुन येत,

मनातल काहूर,

डोळ्यामधे येत ।


थोडी हूर हूर,

मग मन शांत होत ।

घाटाला जवळून,

पाहील का कधी !!


घाट निर्सगाचच,

एक रुप असत ।

छोटासा वाहनारा,

झूळ झूळ नाला ।


एक छोटस ड़बक ।

थोडीसी आजू बाजू,

दीसनारी हिरवळ ।

मधेच उमललेल,

एकाद गवती फूल ।


वाऱ्याच्या झूळकेने,

मन कस तर तरते ।

पन अर्धजळीत ,

लाकड़ पाहून ।

तेच मन घाबरते ।


घाटाला जवळून,

पाहीले का कधी !!

सावली साठी,

एकाद वडाचे झाड,

एकाद असत निंबाचे ।


झाडावर पक्षांची,

होनारी चीव चीव ।

मधेच कावळ्याची,

कांव कांव,

मन हादरुन देते ।


हळू हळू मग ते,

भानावर येते ।

मग एकच लक्षात येते।

घाट नाही काही दूसर-तीसर

आणी..

हेच आहे जीवनाच खर

हेच आहे जीवनाच खर


Rate this content
Log in