किलकिला
किलकिला
किलकिला एक सुंदर,
छोटंस गोंडस पाखरु.
लांब सी टोकदार चोच,
पीवळी पीवळी छाती,
पंख छान छान नीळे.
या झाडावरुन,त्या झाडावर,
किल..किल... किल....
करत धुंदीत तो उडे .
जसे की येत आहे राजा,
दूसऱ्या पक्षांना कळे.
आम्ही मात्र बावळे.
उगीच आवाज त्याचा ऐकून,
त्याला मात्र खुप छळे.
एक क्षण थांबून,
तोंडातली शिवी,
तोंडाबाहेर पडे.
मनात होता मोठा बागलबुवा.
आवाज त्याचा ऐकला की,
काही तरी अघटीत होईल,
हेच अाम्हास नक्की ठावा.
मग घेत देवाचा धावा.
हृदययातल्या लोकांची नाव,
ओठावर झटपट येत.
सगळ्यांना सुखी ठेव देवा,
म्हणत होतो एक श्वास घेत.
हल्ली मात्र आमची असते,
उगीचीच हातघाई.
आम्ही आपल्याच घरात,
मनवत राहतो जश्न.
कोण?
कुणाची करेल आठवण.
हाच असतो प्रश्न.
विकासाचा अन् डीजे,
याचा लागला नाद.
किलकिला झाला,
आमच्या जीवनातून बाद,
जीवनातून बाद...
