भानामती
भानामती
यौवनाच्या जीवनी,
ना ध्यानी, ना मनी .
मारली गेली मती,
न कळत आली,
जीवनामध्ये भानामती .
भानामतीने जीवनाला,
असे काही मोहले.
नंतरचा काळ फक्त.
मान हालवत राहले.
मानेच्या वरचा भाग,
घेतला तीने ताबा.
एक वर्षातच तोतडे बोल,
ऐकायला आले बाबा.
बाबा बाबा करत मग,
रांगायला लागल लेकरु.
काखेत घेऊन फिरू लागलो,
दोघेही ते कोकरु
हे करु का ते करु,
झाला, भानामतीचा,
मग खेळ सुरु .
खेळामध्ये,खेळता,
लागायला लागला दम,
तोंही येई फेस.
कळले नाही कधी,
केव्हा उडाले डोक्याचे केस.
केसाच नाही घेतलं,
कधीही मी उरी.
पन जास्तच वाढाले,
लागल्या हो कुरबुरी.
एकदा तर कुरबुरीत,
असं तिनं म्हटलं,
"मायाच नशिबात,
हे असं भेटलं?"
मग मीही थोडा,
जोमान पेटलो.
उगीच ताव आणून,
मग सोफ्यावर बसलो.
तोंडाची बडबड,
भांड्याची आदड-आपट.
याचा आवाज येतो दुरुन.
याच संगीतामधे जातो,
आता आमचा वेळ.
सुरु आहे अजून आमच्या,
भानामतीचा खेळ.
