STORYMIRROR

Priyanka Kumawat

Tragedy

3  

Priyanka Kumawat

Tragedy

नकोशी ती

नकोशी ती

1 min
176


नकोशी ती

आईला जड झालेली

वंशाचा दिवा हवा असताना

मुलगी जन्माला आलेली

न मिळाला आईचा पान्हा

न भेटली आईची माया

सारे जग गेले बघूनी

पण ना आईने पाहिले तिला

आजी बाबा वडील काका

सगळी सुखे मिळाली

पण आईच्या प्रेमासाठी

ती नेहमीच तळमळली

दिवाबत्ती ला रोज ती

देवाला प्रश्न विचारे

जन्माला आल्या आल्याच

मला का ही शिक्षा रे?

एका बाईलाच मान्य नाही

जन्म दुसऱ्या बाईचा

एका बाईनेच का करावा

दुसऱ्या बाईचा तिटकारा?

हे दु:ख तिच्या मनात

नेहमी सलत राही

आईचे प्रेम मला

मिळेल ना पुढच्या जन्मी?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy