STORYMIRROR

Priyanka Kumawat

Others

4  

Priyanka Kumawat

Others

जन्म बाईचा

जन्म बाईचा

1 min
329

कधी मिळे घरात उपेक्षा

कधी बाहेर घाणेरड्या नजरा

नकोसा वाटतो हा

जन्म मुलीचा नव्हे बरा

ही सीमा ती मर्यादा

सांभाळून सारे काही

एक चूक घडताच

समजून कोणी घेत नाही

कोणाच्याही प्रेमाला

नकार द्यायची भिती

अॅसिड हल्ला, रेप काही

करून तो मोकळा होई

लग्नाच्या बाजारात कळे

खरी किंमत आपली

पैसे आपण मोजले तरी

सासरी मजुरी तिनेच करावी

बाई असली तरी

हट्ट दिव्या चा राही

वंश पुढे वाढवायला

मुलगाच कामात येई

बाईचा जन्म हा फक्त

परोपकाराचा

स्वत:ला विसरून दुसर्यांचे

स्वप्न साकारण्याचा


Rate this content
Log in