STORYMIRROR

Priyanka Kumawat

Tragedy

4  

Priyanka Kumawat

Tragedy

भिकारीण

भिकारीण

1 min
274

लहानग्याला कड्यावर घेऊन

यायची ती नेहमी दुपारी

कालचे परवाचे काहीही असुद्या

तिच त्यांची न्याहारी

नवरा आहे पक्का दारूडा

काय करणार ओ ताई !!

मलाच बघायला लागणार

असे नेहमी म्हणत राही

अवतार आमचा बघून

कोणी काम ना देई !!

भीक मागून खायचे एवढा

एकच उपाय मग राही

शिळे खायला देऊन पोराला

रोज तिळतिळ तुटते मन

पण उपाशी राहून मरण्यापेक्षा

खाऊ दे शिळे हेच आमचे जगण

ताज खायला कधी लेकरू मागत नाही

कधी मागत नाही एखाद खेळण

त्यालाही आता समजून चुकलय

आमचे हे जीवनच बनले एक खेळण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy