STORYMIRROR

Pradeep Sahare

Tragedy

4  

Pradeep Sahare

Tragedy

हुंदका

हुंदका

1 min
395

लहान पनी येणारा,

हळू हळू हुंदका .

आईच्या मागे,

किंगरी म्हणून लागायचा .

पाठीवर धपका बसला की,

भोंगा वाजवून रड़ायच .

हातावर काही भेटल की,

मग भोंगा थांबत थांबत,

हुंदका थांबत थांबत,

डोळे पुसत, पुसत .

यायच चेहऱ्यावर हसू .

मग चेहऱ्यावरच हसू,

थोड़ बाद झाल,

अणं हे हव,ते हव,

रड़गाण सुरु झाल .

रड़गान्याला घालत अावर,

एकदा हूंदका,

लग्नमंडपात आला .

थोड़ा वेळ थांबून मग,

छोट्या मोठया कुरबुरीत .

हरवून गेला....

आणी.. अाणी परत अाला तो!

आपल्या प्रीय व्यक्तिच्या,

मृत्युच्या उंबरठयावर .

ऐका मागून एक,

येणारा हुंदका .

कसा हंबरडा बनतो .

आणी अश्रूंना,

वाट मोकळी करुन देतो .

ह्यदय शांत होई पर्यत ...

ह्यदय शांत होई पर्यत ....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy