STORYMIRROR

Pradeep Sahare

Inspirational

3  

Pradeep Sahare

Inspirational

खरच का ?

खरच का ?

1 min
178

खरच का हो,

समाज असा असतो?

जसा दिसतो,

तसा का नसतो !

रोज रोज कानावर,

येतात नव्या नव्या बातम्या ।

खळवळतो आत्मा ।

मन होत शून्य ।

तरी पन स्वताला,

समजतो धन्य ।

ईवलीशी पोर,

तीला काही नसत ।

म्हाताऱ्या थेरड्याला,

काय बर दिसत ।

बापासाठी लेक,

 असते खूप प्यारी ।

का बरे दिसते मग,

त्यालाच ती न्यारी ।

पाटलाची सून,

रुबाब असतो भारी ।

का बरे लटकते मग,

पंख्याला दोरी ।

कधी कधी वाटते,

होईल हो सुधारना ।

पन रोज हो यात,

नव्या बातम्यांचा भरना।

बाप पोरा साठी,

फिरला दारो दारी ।

का बरे तोच करतो मग,

वृध्दांश्रमाची तयारी ।

भावंडा मध्ये,

प्रेम खूप असत ।

वैमनस्याचा विंचु,

का बर ड़सतो ।

खर काय नी खोट काय,

प्रश्न समोर दिसतो ।

का बर समाज,

दिसतो तसा नसतो ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational