जादू
जादू
संसार आहे भाऊ,
एक जादूचा खेळ ।
धङधाकट मानसाला ,
एक नारी लावते वेड़ ।
एकदा लागल वेड़
नाही राहत मग,
वेळेच त्याला भान,
दिवस अनं रात्र,
दोन्ही वाटते समान ।
एक एक भेटी साठी,
जीवाचा आटापीटा।
एक सारख्या घरासमोर,
दिवस रात्री खेटा ।
संपल्या एकदाच्या खेटा,
मग होते सुरु खेळ।
जी वेळ,
लावत होती वेड ।
ती वेळ आता,
खायला धावते ।
बंधनाच कोयत,
माग माग धावते ।
इथ नको जाऊ,
तीथ नको जाऊ ।
इकडे नको पाहू,
तीकडे नको पाहू।
आवडी निवडी,
गुंडाळून ठेवते भाऊ।
भेंडीची भाजी,
पनीर सारखी वाटते ।
खारट झाली तरी,
ताट घेऊन चाटते ।
छोटया,मोठया गोष्टीचा,
होते मोठा बाऊ ।
मुंग गीळून बसते,
दयता सारखा भाऊ।
अस नाही भाऊ,
तीला नाही कळत,
सगळ तीला कळते ।
कळल की मगं,
वड्याच तेल,
वांग्यावर काढते ।
एवढया मोठया,
ढाण्या वाघावर,
होते जबान सैल।
कधी वाटते चक्रम,
अन...
कधी वाटते बैल ।
हीच आहे भाऊ,
खरी मोठी जादू।
म्हणून सांगतो एकदा,
नका लागू नादी...
नका लागू नादी...