Pradeep Sahare

Others

3  

Pradeep Sahare

Others

झुंझ

झुंझ

1 min
178


झुंज जीवनाची,

ना संपली कधी ।

चालत आली आहे,

आदी- अनादी ।

कळा आणि वेदनेसह,

तुटली नाळ ।

जन्माला आले बाळ,

आणी सुरु झाला,

जीवनाच्या झुंझीचा काळ ।

झुंज इवल्याशा हातांनी,

मातृत्व अमृत पीण्यासाठी ।

झुंज ती रांगत रांगत,

खेळने पकडण्याची ।

झुंज ती गुडगुडी संग,

सावध पावलांनी चालण्याची ।

झुंज ती अड़खड़नारे शब्द,

शब्दामधे बोलण्याची ।

पुढे पुढे ही झुंज वाढत गेली,

एक एक पायरी चढण्यासाठी।

कधी प्रथम येण्यासाठी,

प्रथम येउनही, झुंज ना संपली।

झुंज चालत राहली,

नोकरीसाठी, कामासाठी ।

एक एक पैसा साठविण्यासाठी।

झुंज तोड़का मोड़का,

संसार चालविण्यासाठी ।

झुंजीशी झुंजत आली साठी ।

मग औषध पाण्याच्या गाठी ।

गाठीभेटी वाढ़त गेल्या ।

मग झुंज जगण्यासाठी ।

शेवटी काळाची खेळी,

झुंज संपली एकदाची,

एकाच वेळी...

झुंज संपली...


Rate this content
Log in