माझा शेतकरी
माझा शेतकरी
माझा शेतकरी,
राहला नेहमी,
दबून ओझ्याखाली ।
कधी निर्सगाच्या लहरीत,
कधी बाबूगीरिच्या वारीत
कधी सावकाराच्या ओसरित।
कधी बँकेच्या दारात ।
तरी.. तरीपण,
दबला पण नाही हारला।
सगळयांना पुरुण उरला ।
उठतोय प्रत्येकदा,
ताठ ताठ मानेने ।
करतोय नीडर सामना,
प्रत्येक ऋतुषी,
निर्सगाच्या लहरीपनाशी ।
