छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
पोटी जिजाऊ मातेच्या
शिवराजे जन्मा येई
वाजे नगारा, सनई
नगरीत हर्ष होई ||
'श्रीच्या' स्वप्नपूर्तीसाठी
बाजी लावली प्राणाची
गडा फडके भगवा
स्थापनाही स्वराज्याची ||
दऱ्याखोऱ्यातही गुंजे
हर महादेव नारा
होता शिवबाच्या पाठी
मावळ्यांचा गट सारा ||
नसे जाती भेदभाव
असे दीनांचे कैवारी
परनारी मासमान
नसे तोड बाणेदारी ||
वाघ नख्यांनी कोथळा
अफजलखाना फाडी
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
गडा सैनिकास धाडी ||
शिव जयंती उत्सव
आज करितो साजरा
राजे पुन्हा जन्मा यावे
त्यांना मानाचा मुजरा ||