Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Inspirational

3.9  

Sarika Jinturkar

Inspirational

क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई

क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई

1 min
245


निर्भयी, पराक्रमी, 

तेजस्वी अशी बालिका  

कर्तबगार,कर्तव्यदक्ष मोरोपंताची

 लाडकी लेक होती मनिकर्णिका  


शिक्षणासोबत आत्मरक्षा, घोडस्वारी,निशानेबाजी  

घेराव, बंदूक चालविणे यासारख्या 

गोष्टीमध्ये होती निपुण 

 लक्ष्मी, दुर्गा स्वयंम वीरतेचा अवतार मराठे प्रफुल्लित होऊन जाई त्यांची तलवारबाजी बघून  


झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकरांशी विवाह झाला वय चौदा वर्ष असतांना 

 नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले त्यांच्या गुणांची पारख करतांना 

कालांतराने गंगाधर यांचे निधन झाले झाशीच्या राणी लक्ष्मीबाई बनल्या उत्तराधिकारी  


ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आदेशाला न जुमानता

 स्वाभिमानाने राणीने "मी माझी झाशी नाही देणार"

 हे स्फूर्तीदायक उद्गार काढले त्याठिकाणी  


इंग्रजांच्या मनात निर्माण केली धास्ती  

अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य उठावातील

 त्या होत्या एक अग्रणी सेनानी 

पाठीशी आपले बाळ आणि हातात तलवार 

 घेऊन लढणारी शूर वीरागंणा,धाडसी,पराक्रमी, धोरणी


निष्ठा राज्याप्रती मनी नव्हता स्वार्थाचा भाव कुठे

 होऊन प्रेरित शिवरायांच्या विचाराने शौर्याने, आत्मविश्वासाने

 होऊन अश्वारुढ राणी लक्ष्मीबाई शत्रूवर प्रहार करे  

झाशीला वाचवण्यासाठी आपल्या

 प्राणांची दिली ज्यांनी आहुती  

इतिहास रचला, प्रत्येक स्त्रीच्या मनात साहस अन् ऊर्जेचा संचार घडवला अशी होती ही रणरागिनी  


"स्त्री शक्तीचा महिमा" जगास दाखवणारी

प्रजाप्रेमी, गुणवान,गुणवंती

 प्रजेसाठी लढणारी 


 शब्दात मावतील ज्यांचे कार्य, हे मिथ्य आहे सारे 

तेज पाहुनी, वाट आपली बदल होते वारे

मातृभूमीसाठी केला त्याग जीवनात दिले समर्पण  

भारताच्या स्वातंत्र्य उठावातील क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना माझे शतशः नमन 


Rate this content
Log in