Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

madhuri deore

Inspirational

3  

madhuri deore

Inspirational

माझी आई सिंधुताई

माझी आई सिंधुताई

1 min
239


हसण बागडण्याचे दिवस तिचे,

शिक्षणही नव्हते संपले तिचे,

लहानपणीच लग्न लागले तिचे,

संसारात मन कसे रमेल तिचे?


सासरी नांदताना कष्ट केले,

बालपण कधीच हरवले,

सुखी संसाराचे स्वप्न पाहिले,

त्यात तिचे काय चुकले?


नवऱ्याने दिले हाकलून जरी,

गाईच्या गोठ्यात विसवल्या तरी,

जन्माला आली ममता परी,

असे वाटले माणसापेक्षा जनावरं बरी.


लहानग्या ममताला कुशीत घेऊन,

भीक मागितली दारोदार जाऊन,

रेल्वे फलाटावर सुद्धा राहून,

खाल्ली भाकर स्मशानाच्या चितेवर भाजून.


अंधारात पेटती मशाल तुम्ही,

विसणाऱ्या दिव्याची उम्मीद तुम्ही,

हजारो अनाथांना वाढवलं तुम्ही,

दिले सर्वांना शिक्षण व जगण्याची प्रेरणा तुम्ही.


थांबवले होते आकाश तुम्ही,

थांबवले सागरालाही तुम्ही,

केली संकटांवर मात तुम्ही,

लहानग्यांसाठी स्वतःला झोकावले तुम्ही.


आपली धरणीमाता एक आई,

जन्म देणारी असते दुसरी आई,

अन् तीसरी आई आहे सिंधुताई,

तुम्ही तर आई, ताई अन् सर्व जगाच्या माई.


तुम्ही आहात जगावेगळी आई,

दोनशे अठ्ठावनं पुरस्कारांची माई,

आहात आमच्यासाठी खूप प्रेरणादायी,

शत शत प्रणाम सिंधुताई.......

शत शत प्रणाम सिंधुताई.........



Rate this content
Log in