STORYMIRROR

madhuri deore

Others

4  

madhuri deore

Others

प्रेमाचे बंधन अतूट (भाऊबीज)

प्रेमाचे बंधन अतूट (भाऊबीज)

1 min
569

दिवाळी येता घरोघरी

लागे माहेराची ओढ खास

प्रेमाचे असते बंधन अतूट

भाऊबीजेची लागते आस.


कार्तिक शुद्ध द्वितीयेला

थाटात भाऊबीज आली

भाऊ-बहिणीच्या प्रेमळ

नात्याला फुंकर घाली.


आईसारखे काळजी घेतेस

बाबांसारखी धाक दाखवतेस

नेहमी माझी पाठीराखन करतेस

ताई, तू सर्वांसाठी किती झटतेस?


बहिण भावाचे प्रेमच आगळे,

करीते प्रेमाने भावाचे औक्षण

लावून भाळी भाग्याचा टिळा

आळविते त्यास करण्या रक्षण.


काय देऊ भेट ताईला?

नको भाऊ, तुमचा काही आहेर

तुलाच लाभो उदंड आयुष्य

राहोत तुम्ही माझेच आधार अन् माहेर.


Rate this content
Log in