Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

madhuri deore

Inspirational

3  

madhuri deore

Inspirational

गुरु जीवनाचा शिल्पकार (अभंग)

गुरु जीवनाचा शिल्पकार (अभंग)

1 min
199


गुरू तो प्रेमळ l मनी दिलदार l

असे डौलदार l व्यक्तिमत्व ll १ ll


गुरू ध्येयनिष्ठ l तो जबाबदार l

तारा दर्जेदार l अप्रतिम ll २ ll


तो विचारवंत l तो वाकबगार l

खूप दर्जेदार l गुरुराया ll ३ ll


गुरु विद्यार्थ्यांचा l असे शिलदार l

मोठा सरदार l समाजाचा ll ४ ll


तो भक्ती शक्तीचा l आहे भरदार l

श्रेष्ठ कलाकार l सर्वांसाठी ll ५ ll


गुरू जीवनाचा l खरा शिल्पकार l

उत्कृष्ट आकार l शिक्षणाला ll ६ ll


गुरु तो निस्वार्थ l मुख्य कलाकार l

मनी सहकार l हृदयात ll ७ ll


राजांचा तो राजा l कर्तव्य निष्ठुर l

सर्वांचे उभार l देतो मनी ll ८ ll


गुरु करी सर्व l जगाचा उद्धार l

नाही उपकार l फिटणार ll ९ ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational