दिवाळी पाडवा
दिवाळी पाडवा
1 min
342
आज आहे बलीप्रतिपदा
पती-पत्नीसाठी दिवाळी पाडवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक
सदा राहो त्यांच्या नात्यात गोडवा.
पत्नी लाडक्या पतिराजाला
औक्षण प्रेमभरे ओवाळते
एकमेकांच्या सहजीवनातील
नाते वृद्धिंगत करते.
लाडक्या पती-पत्नीसाठी
हा दिनच असतो खास
प्रेमाने भेटवस्तू देऊन
पत्नी भरवते लाडूचा घास.
ओढ एकमेकांसाठी गुंफली
मनातील भावनांच्या ओलाव्यात
नेहमीच असते आयुष्यात साथ
स्वप्नदायी सुखी संसारात.
एकमेकांना घेत समजून
प्रीत नात्यांची बहरली
जीवन सुगंधी होण्यासाठी
दीपज्योत तेवत ठेवली.
