दिवाळी (मधुसिंधू काव्य )
दिवाळी (मधुसिंधू काव्य )
1 min
341
आली दिवाळी
दिन ते हसरे
आनंद पसरे
फुलांच्या माळी.
सजे तोरण
मांगल्य दारात
सौख्य ते घरात
मानू आपण.
स्वतः बनवू
आकाश कंदील
सुख मिळतील
शान मिरवू.
फराळ करू
चकली भाजणी
खाऊ सर्वजणी
डबेही भरू.
नवे कपडे
सर्वांना आणूया
आनंदे घालूया
मज्जाच गडे
येतो पाडवा
मग भाऊबीज
पूजा करू तीज
सर्वा गोडवा.
करू मदत
गोरगरिबांना
सुख ते तयांना
मनामनात.
