सुट्टी (मधुसिंधू काव्य )
सुट्टी (मधुसिंधू काव्य )
शाळेला सुट्टी
आनंद साजरा
मुलांना तो खरा
घेऊया बुट्टी.
परीक्षा झाली
गावाकडे जाऊ
गोड धोड खाऊ
सर्वच आली
किल्ले बनवू
एकत्र जमूया
धमाल करुया
थाप मिळवू.
वेळ मजेत
कुठे तो जातो
वाट ती पाहातो
फक्त हवेत.
सर्व भेटती
मारू खूप गप्पा
मस्तीचा तो टप्पा
मित्रांसोबती.
सुट्टी संपली
पाहता पाहता
मनाला शांतता
किती भावली.
