गुरु महिमा
गुरु महिमा
प्रथम गुरु माझे आहेत,
वंदनीय माता-पिता देवासमान,
द्वितीय गुरु माझे आहेत,
निस्वार्थी शिक्षक निसर्गासमान.
गुरु माझा ज्ञानाचा सागर,
त्यांच्यामुळे गिरवली मी अक्षर,
गुरु माझा चैतन्याचा अविष्कार,
त्यांच्यामुळे मिळाले जीवनाला सार.
गुरु माझा विद्येचा परिमळ,
त्यांनीच भागविली ज्ञानाची तहान,
गुरूंचे शिष्यही खुपच प्रेमळ,
म्हणूनच गुरू माझे जगती महान.
गुरू माझा परिपूर्ण पुरूषोत्तम,
असे मनी त्याच्या दुसऱ्यांचेच हित,
गुरु माझा चंदना समान,
सर्वदूर पसरवे सुवास मनात.
गुरु माझा मार्गदाता खरा,
पाहतो ज्ञानाचा अखंडित झरा,
गुरु करी बहुमोल उपदेश,
काढून टाकीन मनातील दोष.
गुरु माझा देतो जीवना आकार,
करितो सर्व जगाचा उद्धार,
गुरु मुळे माझ्या शिष्यांना सन्मान,
राहे अधुरे ज्ञान गुरुविना.
गुरूचा महिमा अगाध राही,
झुकतो माथा त्यांच्या पायी,
त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही,
त्यांचे उपकार आयुष्यभर फिटणारच नाही.
गुरू आहे जीवनाचा खरा शिल्पकार,
देई सर्वांच्या जीवना आकार,
गुरू आहे जीवनाचा महामेरू,
वर्णन त्यांचे किती करू?
