STORYMIRROR

Rachana Chavan

Inspirational

3  

Rachana Chavan

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
319

'तू' तूच आहेस ती

 शिवाची शक्ती

विश्र्वाची माता

ईश्वराची भक्ती

करुणेची देवता II


'तू' तूच आहेस ती

आरस्पानी रूपगर्विता

सरस्वतीची गाथा

दैत्यानाशासाठी जन्मिली

दर्गा आणि रणचंडिका II


'तू' तूच आहेस ती

अनंतरूपी एकता

पाझरती प्रेमदेवता

विष्णुपत्नी जगसम्राज्ञी

हृदयांवर तुझीच सत्ता II


मग...मग हे वसुंधरे

का तुझ्याच या मातीत

तूच अपमानित होत आहेस

समाज कंटकांच्या हाती

बाहुली होवून नाचत आहेस II


कित्येक काळ लोटुनी गेला

'स्त्री पुढारली' समाज सुधारला

पण नाही....नाही कारण,

त्यावेळीही तू भोगदासी होतीस

आजही भोगदासीच राहिलीस II


आधुनिकतेच्या नावाखाली

तुझ्या शरीराचा लिलावच चाललाय I

स्वैराचारावर स्वतंत्रतेचे लेबल दाखवून

तुझ्याच हस्ते

तुझ्या विवस्रतेचा विकृत बाजार मांडलाय I

तुझं 'मानवी' अस्तित्व नाकारून

तुझ्यावरला बलात्कार - अत्याचार

बोकाळतच चाललाय II


जर आहेस तू खरी आदिमाया- शक्तिदेवता

तर जागी हो ....जागी हो आणि

मोडून काढ तुझी चाललेली विटंबना

जगाला होवूदेत तुझी खरीखुरी ओळख I

तुझ्या देहाची नाही

होवूदेत तुझ्या अस्मितेची - अस्तित्वाची

आणि तुझ्यातील ‘माणसाची’ पारख II

हो खऱ्या ‘अभिव्यक्तीची’ धारक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational