STORYMIRROR

Rachana Chavan

Abstract

3  

Rachana Chavan

Abstract

मृगजळ

मृगजळ

1 min
239

आता कुठे मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे माझ्या चिमुकल्या पाखरांनी

तान छेडून जीवनगाणे सजवितील ते त्यांच्या सुरांनी

चालता चालता वेळेवर तहान - भूक लागली कि कळते त्यांना

आणि तृष्णेने अगदीच कासावीस व्हायला झालेच तर ..

तर ..'विहीर कशी खणावी' हे उपजतच शिकविले आहे त्या परमपित्याने त्यांना

त्या परमपित्याने निर्माण केलेल्या या रमणीय धरेवर

निसर्गरूपाने त्यानेच सर्व व्यवस्था केली आहे माझ्या बाळांच्या गरजपूर्तींसाठी

खाद्य, बुद्धी, आणि आंतरिक समझ

या सर्वांचाच ‘आहेर’ दिला आहे माझ्या तान्ह्या जीवांच्या सर्वांगीण तृप्तीसाठी II


कान उघडून ऐक हे $$ मनुष्य योनीत वावरणाऱ्या स्वार्थी व्यापारी पिशाच्या $$

तुला कोणताच नैतिक अधिकार नाही आहे

हो, तुला कोणताच नैतिक अधिकार नाही ‘अवेळी’च माझ्या बाळांची तृष्णा वाढवायचा

तुला कोणताच नैतिक अधिकार नाही त्यांच्या वाटेवर पावला पावलांवर "मृगजळ" निर्माण करायचा

तुला कोणताच नैतिक अधिकार नाही त्यांच्या 'निरागसतेला' कोमेजून टाकण्याचा II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract