STORYMIRROR

Rachana Chavan

Others

3  

Rachana Chavan

Others

आई

आई

1 min
198

वंदन करण्या कर जुळती जिथे

मन्मातेचे आहे स्थान तिथे

दैवतांआधीची दैवत

मन माझे सदा तिजला पूजत II


मायेचा ओझरता तिचा पदर

जणू अंगावर ल्यालेली रेशमी शाल

तिने दिधले जे संस्कारधन

पुरवेल आयुष्याला सु-मनाची ढाल II


"गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे"

अरे $ आहे तथ्य त्यात असे मला वाटे

बालपणी झेललेस जर का हे काटे ,

बघ तुझ्या आयुष्यात गुलाबपंखुडीच साठे II


'तू' पड - धडपड, दुःखात रड

मुखी बघ तुझ्या नाव येईल फक्त "आई"

येणारच........कारण,

तुझ्या हृदयाचा चुकलेला एक ठोकाही कळतो जिला

ती आहे तुझीच मायाळू माई II


साता जन्मांनंतरही फेडतील का हे ऋण तिचे

जिच्या सोसलेल्या कळांनी

तुला अस्तित्व दिले 'मी' चे II


अरे माझ्या मना $$ नेहमीच जाण ठेवायची

विसरायची नाही महती त्या माऊलीची

जी तुझ्या आजारपणात रात्र रात्र जागवायची I

वेळ येईल कधीतरी

तिच्या म्हातारपणीची काठी बनायची

तेव्हा मात्र दाखवू नकोस

तिला वाट वृद्धाश्रमाची II


Rate this content
Log in