इंद्रायणी
इंद्रायणी
इंद्रायणी उगमते
कुरवंडे डोंगरात,
लोणावळा जवळील
नागफणी या गावात..१
श्रद्धास्थान असलेली
सर्व या वारकऱ्यांची,
करी इंद्रिय पवित्र
इंद्रायणी ही आमची..२
झरे येऊन मिळती
वाटा कुंडली आंध्राचा,
पाणी पुरवते नद्या
इंद्रायणी वाहण्याचा..३
वाहे सह्याद्रीत नदी
करे प्रवास पावन,
भूमी पवित्र संतांची
होई घातक मलिन..४
सोडे रसायन युक्त
मैल मिश्रित पाण्यात,
घाण अवस्था नदीची
पाणी बदले विषात..५
पाणी साठा प्रदूषित
घडे दुर्दशा दर्शन,
काम शुद्धीकरणाचे
इंद्रायणी सुधारून..६
घ्यावे प्रकल्प सुधार
इंद्रायणी स्वच्छतेचे,
स्नान मानवी देहास
करे पवित्र मनाचे..७
