* सखी*
* सखी*
सखींची सखी अशी
सखी आमची आवडती,
आज आहे वाढदिवस
साजरा करूया सर्वांसोबती...१
जीवेत शरद: शतम्
उदंड आयुष्य लाभो,
सदा हास्य उमलो मुखवर
यशाचे उंच शिखर गाठो...२
दिवस आज आनंदाचा
यश कीर्ती संपन्न करो,
लेखणीस देऊनी गती
आकाशी उंच भरारी घेवो...३
जीवनातल्या अडचणींवर
धैर्याने सामोरे जावो,
कधी लागली ठेच कुठे
सखीस या आठवणीत ठेवो...४
समूह तुझ्या नेहमी पाठीशी
दुःख कशाचे न तुला भासो,
मैत्रिणी आम्ही तुझ्याच राणी
हक्काने आम्हां वर विश्वास ठेवो...५
सुख नेहमी दारी येवो
घर भरभराटीने न्हावो,
हेच आशीर्वाद आज देते
नेहमी अशीच हसतमुख राहो...६
पावन तुझ्या या दिवशी
शुभेच्छांचा वर्षाव होवो,
कोटी कोटी शुभेच्छांचे
आशीर्वाद तुला मिळत राहो...७