STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

प्रेम

प्रेम

1 min
207

प्रेम ही सुंदर कल्पना

कोणाच्यातरी विरहात असणे, 

म्हणजे प्रेम होय

कोणासाठी तरी त्याग करणे, 

म्हणजे प्रेम होय


प्रेम ही एक अशी अमूल्य गोष्ट आहे, 

जी स्वतः अनुभवल्या वरच समजते

प्रेमातला एक एक शब्द 

महत्त्वाचा असतो

विश्वासाने दिलेला हात, 

आणि विश्वासाने घेतलेला हात, 


या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्त्व असते

प्रेमाशिवाय जग अपूर्ण आहे

प्रेम दिल्याने वाढते,

प्रेम केल्याने समजते,

प्रेमाची मूर्ती अमर आहे


प्रेमासारखे सुंदर असे नाते नाही

प्रेमासाठी माणूस जगतो, 

प्रेमासाठी माणूस मरतो,

प्रेम आहे म्हणूनच माणूस टिकून राहतो

प्रेमाच्या भाषेने जग बदलते,

प्रेमामुळेच जगातील माणूसकी टिकून राहते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational