मदनबाण मोगरा
मदनबाण मोगरा
अंगणात आज माझ्या
सांजवेळी फुललेला,
दिसे मदनबाण हा
सुंदरसा खुललेला..!!१!!
रूप मोहक वाढवे
केसात या माळताना,
सुगंधीत चोहीकडे
मंद पसरवताना..!!२!!
मन प्रसन्न वासाने
आल्हादक चित्तवृत्ती,
झटकण्या औदासिन्य
दिसे मोगरा पसंती..!!३!!
सजावटी बरोबर
आयुर्वेद उपयोग,
वापरुन हा मोगरा
मनी चिंतन सुयोग..!!४!!
नाना तऱ्हेचे मोगरे
काम करी हर एक,
दूर करून समस्या
फुले मोगरा अनेक..!!५!!
फुलं ओंजळ भरून
कामकरी परिणाम,
कळे महत्त्व फुलांचे
घेऊ मुखी हरिनाम..!!६!!