मैत्री एक नात
मैत्री एक नात
मैत्री म्हणजे
मनाची भाषा
शब्दांविना जाणी
भावनांची दशा
मैत्री म्हणजे
मायेचा सागर
अथांग समुद्रातील
लाटांची लहर
मैत्री म्हणजे
निशब्द संवाद
खचलेल्या उभारी देई
नाही कुठे वाद
मैत्री म्हणजे
सतर्कतेचा इशारा
योग्य मार्गावरचा
तोच एक सहारा
मैत्री म्हणजे
आयुष्याचे सोबती
संकटे येता अनेक
दावी विश्वासाची अनुभूती
मैत्री म्हणजे
वाहनारा सुंदर झरा
सोबतीला उभा कायम
तोच माझा सांगाती खरा