देवपण
देवपण
हरवली माणुसकी
आज सर्वत्र बघते,
मदतीचा देता हात
माणुसकी मी शोधते..१
सत्यधर्म मानवता
आस ही माणुसकीची,
नष्टकरी जातीभेद
वाट ही प्रबोधनाची..२
मना संस्कारी उद्धारी
एक मेका साथ देई,
दीन दुबळे पाहता
मदतीची हाक येई..३
शोधे देवा देवपण
माणुसकी समाजात,
उपयोगी गरजूस
मदतीस पाठवत..४
नको राहून गहाळ
कर मानवी कदर,
प्रेम जाणीव ठेवून
द्यावे व्यक्तीस आदर..५
करा सुंदर विचार
घडे लख्ख व्यक्तिमत्व,
ठेवा शुद्ध वागणूक
मोठे होईल कर्तृत्व..६
