STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

आयुष्यातील इंद्रधनुष्य

आयुष्यातील इंद्रधनुष्य

1 min
243

आयुष्य खूप सुंदर आहे----

फक्त तुम्ही ते जगायला शिका-----

सुख आणि दुःख जीवनात येतच असते

दुःखावर मात करूनी सामोरे जायला शिका ||


आयुष्य म्हणजे कधी अंधार 

तेव्हा काळोखात बुडाव लागतं

परस्परांच्या बुद्धीप्रकाशानेचे

इच्छित स्थळ शोधाव लागतं ||


भूतकाळला आठवायचे असते

वर्तमानकाळाला फुलवायचे असते

दु:खायला जवळ करूनी

भविष्याला घडवायचे असते ||


कधीकधी आयुष्य असते लहानांचे हास्य

जिथे स्वतःला मुक्तकंठाने हसता येते

आपण हसल्याचे अनुभवताना

दुसर्‍यालाही सुख देता येते ||


म्हणूनच आयुष्य फार सुंदर आहे

फक्त तुम्ही ते जगायला शिका----!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational