पराधीन तू
पराधीन तू
*विश्वनिर्माती जननी*
*जग उद्धारक राज्ञी तू*
*महिषासूर मर्दिनी अन*
*प्रसंगी रणरागिणी तू*
*दूर्गा,अंबा,कामाक्षी*
*महाकाली रणचंडीका तू*
*भक्तांना तारणारी अन*
*दुर्जनांची संहारिणी तू*
*कर्तव्यदक्ष मनमिळाऊ*
*वात्सल्य मूर्ती,प्रेरणा तू*
*बिकट प्रसंगी धीटपणे*
*तोंड देण्यास खंबीर तू*
*अन्नपूर्णा,गृहलक्ष्मी*
*ताई अन अर्धांगिनी तू*
*विविध भूमिका निभवून*
*आज मात्र पराधीन तू*
*अबला म्हणून हिणवितात*
*तुला आज सर्वजण*
*तुझ्या अभावाने होईल*
*अदृश्य प्रत्येक कणकण*
