STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

धुलीवंदन

धुलीवंदन

1 min
152

फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला

साजरा करतात धुलीवंदन

राख लावतात समस्त अंगाला

आदल्या दिवशी होळीचे दहन.....१


पृथ्वीआप,तेज,वायू आकाश 

पंचक तत्वांना आदर व्यक्ततेचा

सण आनंद साजरा करण्याचा

विविधरंगी एकात्मतेचा.....२


धूलीवंदन म्हणजेच रंगपंचमी

असतो उत्सव विविध रंगांचा

गुलाल व रंगाची उधळण करीत

एकत्रितपणे थट्टामस्करी करण्याचा.....३


वाईट विचारांना शुद्ध करून

मन पवित्र करण्याचा

वैर,असुया,मत्सर,द्वेष दूर सारुन

ऋणानुबंध घट्टपणे जपण्याचा.....४


होळी व रंगपंचमीच्या दिवशी

जतन करावे पर्यावरणाचे

काटेकोरपणे नियम पाळून

भविष्य उज्ज्वल करण्याचे......५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational