Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
161


महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा

अभिमान मला इथे जन्मल्याचा

महाराष्ट्र भूमी अत्यंत पवित्र

गंध निराळा मराठी मातीचा


महाकांतार,महन्त बहुनावे

लाभला सामाजिक व सांस्कृतिक वारसा

प्राचीन मराठी इतिहासाचा

प्रत्यक्ष दर्शन देणारा आरसा


नांदती गुण्यागोविंदाने व प्रेमाने

सर्व जातीधर्माचे लोक

एकात्मता व अखंडतेचे दर्शन

घडवितात प्रत्यक्ष श्लोक


मातृभाषा मराठीसह आहे

प्रादेशिक भाषांना स्थान

अतिथींचा केला जातो

मनःपूर्वक ह्रदयपूर्वक सन्मान


गडकिल्ले व स्मारकातून होते

स्मरण थोर लढवय्यांचे

हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान

देणाऱ्या महान योद्ध्यांचे


मातीच्या प्रत्येक कणाकणातून

सुगंध दरवळतो मराठीचा

संगम आहे या पावन भूमीत

सर्व पंथ व धर्मियांचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational