STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

थंडी

थंडी

1 min
164

कडाक्याच्या थंडीचा गारवा

मनास आल्हाददायक वाटे

वाटे थंडी नकोशी प्रत्येकास

शरीरास बोचती अंगी काटे......१


कोवळ्या रवीकिरणात जाऊन

उष्मा मिळवण्याचा प्रयत्न

डी जीवनसत्त्व म्हणजे जणू

सूर्याकडून मिळते अनमोल रत्न........२


ऋणानुबंध जपणारे जीव

करती जगण्यास धडपड

प्रभात समयी उघडेना

डोळ्यावरची झापड.......३


कधी हवासा कधी नकोसा

वाटतो थंडीतला गारवा

नवयुगलांसाठी पर्वणीच 

जणू चैतन्याचा पाडवा.....४


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational