सोबत
सोबत
1 min
157
अचानक एक वळणावर
नजरानजर आपली झाली
प्रेमळ कटाक्षाने तुझ्या जणू
कट्यार काळजातच घुसली......१
पहिल्या भेटीतच आपल्या
मनोमन झालो एकमेकांचे
विचार आचार सर्व जुळले
प्रेमात पडलो कायमचे....२
संगत जडली तुझी अन् माझी
एकमेकांसाठीच बनविले ईश्वराने
आयुष्याचा भवसागर तरुण लागलो
एकमेकांच्या प्रेमळ सहवासाने......३
आयुष्यात येऊन माझ्या सखे
फुलविले नंदनवन साक्षात
स्वप्नपूर्ती झाली मनतली
प्रत्यय आला प्रत्यक्षात.....४
अजरामर राहील भूतलावर
प्रेम व सहवास आपला
आदर्शाचे धडे घेतील
प्रत्येक जण प्रेमात पडलेला.....५
