STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
141

जन्म देणारी एकमेव माता

बहिण पाठराखण करणारी

हवं नको विचारणारी वहिनी

कन्या तु जीवापाड जपणारी.......१


पत्नीच्या रुपात सहचारिणी

अंबा दुर्गा तु भवानी

अन्नपूर्णा ,मानिनी, मोहिनी

प्रसंगी बनते रणरागिणी......२


प्राचीन युगातील अबला

आज बनली आहे सबला

स्वकर्तृत्वाने व धिटाईने

वाजवते भल्याभल्यांचा तबला.......३


खांद्याला खांदा लाऊन आज

शिखरे काबीज केली अनेक

तु विश्वाची नारी शक्ती आहेस

आहे अग्रेसर क्षेत्रात प्रत्येक......४


त्याग करून स्वार्थाचा

काळजी घेते कुटुंबियांची

येणाऱ्या प्रत्येक संकटांशी

तयारी दोन करण्याची......५


तु विश्वाची नारी शक्ती आहेस

शतश: करतो मी वंदन

स्त्री च्या भावना समजल्या प्रत्येकाला

तर घराघरात फुलेल नंदनवन......६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational