STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

सुखी जीवनाचे सूत्र

सुखी जीवनाचे सूत्र

1 min
158

क्षणभंगूर जीवन जगतांना

मनी ठेवावे चांगले भाव

आयुष्यात प्रत्येक क्षणी

निराशेचा असावा अभाव.....१


पाहतांना प्रत्येक बाबींकडे

ठेवावी सकारात्मक दृष्टि

ह्रदयातील आनंदानें जणू

जाणवेल बहारदार सृष्टी.....२


आहार विचार आचारावर

सदोदित हवे नियंत्रण

मन,शरीर व बुद्धीला द्यावे

ज्ञानवर्धक खुराकीचे आमंत्रण.....३


समाजात वावरताना नेहमी

माणुसकीनेच वागावे

चांगले वर्तन व आचरणाने

प्रत्येकाच्या मुखी नाव निघावे.....४


सुखी जीवनाचे सूत्र

नेतात मानवाला विकासाकडे

वेळच येणार नाही कधी

घालायची कुणालाही साकडे.....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational