STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

दिपोत्सव

दिपोत्सव

1 min
166

करू या स्वागत मनोभावे

आनंदाने दिप उत्सवाचे

तन मनाची करू स्वच्छता

वातावरण होई पावित्र्याचे......१


काढूया मनातील राग द्वेष

बांधूया सेतू सृजनशीलतेचा

देऊन मंगल शुभकामना

सण ऋणानुबंध जपण्याचा.....२


लक्ष लक्ष मंगल दिव्यांनी

साजरा दिपोत्सव करूया

टाकूया परिसर उजळूनी

पर्यावरण हित जपू या.....३


खमंग व गोड फराळाची

करूया देवाण घेवाण 

पाडवा अन् भाऊबीजेला

पत्नी व बहिणीला भेट छान....४


नववर्षाचे स्वागत करूया

दिपोत्सव दिपावलीने

जोपासून मानवता सदा

करूया सत्कार्य सह्रदयतेने....५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational