STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

संस्काराचा मळा माझी शाळा

संस्काराचा मळा माझी शाळा

1 min
137

शाळेचा पहिल्या दिवशी

विद्यार्थ्यांची गर्दी झाली

उन्हाळी सुट्टीनंतर प्रत्येकाला

जणू शाळेची ओढ लागली.....१


कोरोना महामारीमुळे विद्यार्थी

घरातच बंदिस्त होती

उत्स्फूर्तपणे सगळीकडे

स्वच्छंदपणे फिरत होती....२


माझ्या शाळेमध्ये दिले जातात

धडे नैतिक व सामाजिक मूल्यांचे

सर्वांगिण विकासासह येथे

घडविल्या जाते भविष्य भारताचे....३


पोटच्या गोळ्याप्रमाणेच काळजी

घेतल्या जाते प्रत्येक विद्यार्थ्याची

आनंदी वातावरणात रमून जातात

आठवण येत नाही आईवडीलांची....४


तज्ञ व अनुभवी शिक्षक घेतात

मेहनत विद्यार्थी घडविण्यास

संस्कारांचा मळा माझी शाळा

वाटतो अभिमान प्रत्येकास..,...५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational