डॉक्टर ( सहाक्षरी )
डॉक्टर ( सहाक्षरी )
आली महामारी
जेंव्हा पृथ्वीवर
विश्वास ठेवला
त्या डॉक्टरवर
रुग्णसेवा हीच
सर्वश्रेष्ठ मानी
ईश्वर रुपच
डॉक्टर पाहुनी
हातबल मग
होई मानवता
डॉक्टरांचा धीर
तो जीवनदाता
डॉक्टरांमुळे ते
मानवी अस्तित्व
पृथ्वीवर त्यांचे
जाणावे श्रेष्ठत्व
