STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

4  

Bharati Sawant

Inspirational

शिवरायांची प्रेरणा

शिवरायांची प्रेरणा

1 min
257

जन्मला जिजाऊंच्या पोटी

अनमोल हिरा नामे शिवराय 

अचाट पराक्रमाने झुकविले 

गनिमास असताना महाकाय


देऊनी युद्धनीतीचे प्रशिक्षण

बाळकडू जिजाऊंनी पाजले

हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न

साकार या इतिहासात गाजले


गड नि किल्ल्यांची डागडुजी

उभारले होते सशस्त्र आरमार 

नामोहरम गनिमी काव्याने केले

केले चढवुनी हल्लेही धुवाधार


कापले शत्रूचे मस्तक खड्गाने 

शत्रु स्त्रियांचाही केला सन्मान

केले अपराध्यांना योग्य शासन

गाऊया त्यांच्या कीर्तीचेच गान


घेऊनीच ही शिवरायांची प्रेरणा 

लढती सीमेवर आजही शूरवीर 

नतमस्तक होतो माथा आमचा

पाहूनी त्यांचा संयम आणि धीर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational