जाणता राजा
जाणता राजा
सर्वर्थाने भयानक होता तो काळ,
अस्मानी, सुलतानी संकट रोरावत
जुलूम, अत्याचार, बायांची अब्रू लुटत,
प्रजेची अवहेलना, पिळवणूक करत
पाच-पाच पातशाही लचके तोडत,
दोनशे वर्ष महाराष्ट्राला छळ सोसत
संत, ऋषी, स्वामी देवांना आळवीत,
माता जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पडत
दिव्य पुत्र जन्मला शिवनेरी गडावर,
बाळ शिवबा होऊन देव अवतरला
जय भवानी जय शिव जल्लोषात,
यवनांच्या जुलूम मर्दना उभा राहिला
थोर तुझे उपकार राजमाता जिजाऊ,
स्वराज्य जननी वात्सल्य प्रेममूर्ती
प्रेरणा, हिंदवी स्वराज्य स्थापनेची,
मोगलांचा जुलूम संपवण्याची स्फूर्ती
शिवाजी जन्मला दुष्टांच्या संहारास,
माता जिजाऊचे संस्कार लाभे थोर
देशरक्षणा मावळ्यांची केली फौज,
स्वराज्यासाठी जिंकले किल्ले चौफेर
परस्त्रीला मातेसमान देत वागणूक,
गनिमी कावा शत्रूचा ओळखून लढत
लोक कल्याणा जन्मला जाणता राजा,
चालू शिवरायांची प्रेरणा नसात पेरत