STORYMIRROR

Rama Khatavkar

Inspirational

4  

Rama Khatavkar

Inspirational

सृजनाशी संवाद

सृजनाशी संवाद

1 min
200

तुझ्या कुशीत मानिनी,

जीव एक वाढतो.

स्पंदनासवे तुझ्या

कैक कैक बोलतो.


दे तुझाच रक्तिमा,

श्वासही तुझ्यातले,

अन् अबोल भावही

उमलते मनातले.


भय, निराश, वेदना

असेल रागही जरी,

उमटतात ते ठसे

चिमुकल्या मनावरी


म्हणून जाण बाई गं,

तना-मना जपून गं !

उमलती प्रसन्नता

सानुल्यास देई गं !


सान कोवळ्या जिवा,

सर्व सर्व समजते.

हेच गूज जाणुनी

ठरव तूच काय ते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational