।। नवी पहाट ।।
।। नवी पहाट ।।
राजा, तुझ्या दरबारी, मरतो कष्टकरी ,
जो करतो चोरी, तोच करतो शिरजोरी ।
नियमांचे उपासकच नियम मोडत असतात ,
स्पष्ट बोलणाऱ्यांवर उगाच ते रुसत असतात ।
वठणीवर त्यांना आणायला, पूढे कुणी येत नाही ,
घरात बसून म्हणतात ते, मी कुणाला भित नाही ।
आता हे बदलायला हवं, कुणी तरी बोलायला हवं ,
बदल हवा असल्यास, घराबाहेर पडायला हवं ।
नाक मुठीत घेवून, जगावं तरी कुठवर ,
बंड करूनही मिळेलच, पोटापुरती भाकर ।
म्हणून आता उठा, घरात खितपत बसु नका ,
बदलत असलेल्या काळाला, पाठ दाखवू नका ।
बदलत्या काळात, सोडावी जुनी मळवाट ,
रात्रीच्या गर्भातुन, उगवते नवी पहाट ।
