प्रतिज्ञेचे मर्म
प्रतिज्ञेचे मर्म
मानव तितुका एकच आहे
नको बाळगू जाती -पाती
मानवता हा धर्म आपुला
हेच शिकवले संतांनी !!१!!
एकी, शांती, त्याग, प्रिती
भावना ह्या माणिक खाणी
जीवन होईल उज्वल महान
मुखातून जर सत्यवाणी !!२!!
प्रेम, करुणा हीच शिकवण
साऱ्या धर्माचे सार असे
भारत माझा देश आहे
प्रतिज्ञेचे हे मर्म असे !!३!!
सारे माझे बांधव आहेत
यातच आले सारे रे
मग का विचारता एकमेका
तुझी जात कोणती रे !!४!!
जाती-पातीचे राजकारण
नको करू रे माणसा
भारत माझा देश आहे
सारे माझे बांधव आहेत
म्हणत आलास ना सदा !!५!!
प्रतिज्ञेत या आपल्या
साऱ्या जीवनाचे सार आहे !!
