ध्यास स्वराज्याचा
ध्यास स्वराज्याचा
ध्यास स्वराज्याचा
पहिला छत्रपतींनी,
सोहळा या भूवरी
सजला गडकिल्ल्यांनी.
उंच त्या डोंगरमाथी
खोल दरी खोऱ्यात,
हर हर महादेवाचा
सदैव नारा गर्जत.
घनदाट जंगलांचा
वेढा भारी भक्कम,
मजबुत तटबंदीवर
सुंदर नक्षीकाम.
स्वाभिमानी मावळे
झुंजले रणांगणी,
ईतिहास सांगतो
भगव्याची निशाणी.
गडकिल्ल्यांनी पाहिली
रक्तरंजित सारी क्रांती,
छत्रपती शिवबांची सांगे
गडकिल्ल्यांतून महती.
